परतीच्या पावसाच्या भरोश्यावर लातुरकर जगतात. मागच्या वर्षी हा परतीचा पाऊस कुठे गेला कळाले नाही. पण तो यंदा उशिरा का होत नाही परतला. मागच्या काही दिवसात या पावसाने कमाल दाखवली आणि मांजरा धरणात ११.५६ दशलक्ष घनमीटर इतका साठा झाला. अजूनही आवक सुरुच आहे. ही आवक ३० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोचली तर पुढच्या वर्षभर पाणी पुरेल. पण त्यात चोरी व्हायला नको असं पाणी पुरवठा विभागात काम करणारे तज्ञ सांगतात.
वांजरखेडा, कारसा पोहरेगाव, वांगदरी बंधारे आधीच भरली आहेत. आज नागझरी बंधार्याची दारे उघडण्यात आल्याने साई बंधाराही भरला आहे. नागझरी बंधार्यातून लातुरला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मांजरा धरणावरील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडीत आहे. आजही तो नीट झाला नाही. कालचे पाणी आज येईल असे सांगण्यात आले पण आजचे पाणी उद्याही येईल याबाबत खात्री देण्यास कुणीही तयार नाही.