पैशांचा पाऊस पडतो असे सांगत एका मांत्रिकाने बीड जिल्ह्यातील खालापुरी येथील पाच तरुणांना तब्बल साडेतीन लाखांचा गंडा घातला.
दोन दिवसांपूर्वी हा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा शिरूर कासार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गस्तीवर असताना खालापुरी येथे एका वाहनात पैसे मोजत असताना काही तरुणांना नोटा मोजन्याचे मशीन, पैशांच्या बॅगसह ताब्यात घेतले गेलं. त्यांच्याकडून बनावट नोटा असल्याचे समोर आले होते. मात्र या प्रकरणात नवीन वळण आले आहे.
बीड जिल्ह्यातील रायमोहमधील पाच तरुणांना मांत्रिकाने आंबेजोगाई अहमदपूर येथे बोलावले. त्यांच्याकडून साडे तीन लाख रुपये घेऊन बदल्यात एक बॅग दिली. त्यात तिप्पट रक्कम असल्याचे मांत्रिकाने सांगितले आणि वरुन पोलिस आल्याची भीती दाखवून मांत्रिक तेथून निघून गेला. तरुणांनी बॅग उघडल्यास त्यात मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याचे बघून आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले.
दरम्यान शिरूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गस्त घालताना त्यांना एका वाहनात खोके आणि पैसे मोजण्याची मशीन आढळल्यामुळे पाच तरुणांना ताब्यात घेतले गेले. त्यामुळे बनावट नोटांचे रॅकेट असल्याचे प्रथमदर्शी समोर आले होते मात्र नंतर या तरुणांची फसवणूक करून मांत्रिकाने यांना खेळण्यातील नोटा दिल्याचे कळाले.
तरुणांनी खुलासा केला की मंत्राच्या सह्याने पैशाचा पाऊस पडतो म्हणनू मांत्रिकाने तुमच्या हात लागलेल्या नोटा द्या आणि जेवढ्या नोटा द्याल त्याच्या तिप्पट नोटा तुम्हाला देतो असे आमिष दाखले होते. आमदपूर जिल्हा लातूर येथील एका मांत्रिकाने या तरुणांना जाळ्यात अडकवले आणि तब्बल साडेतीन लाखाला गंडवले.