Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा एकदा मराठी भाषिकांचे वर्चस्व प्रस्थापित

shobha soman
, मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (08:06 IST)
महापौरपदी शोभा सोमनाचे, उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड
 
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत सध्या भाजपचे संख्याबळ असले तरी आज झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत महापौरपदी शोभा सोमनाचे व उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाल्यामुळे महानगरपालिकेवर पुन्हा एकदा मराठी भाषिकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
 
कन्नड संघटनाकडून कन्नड भाषिक उमेदवार देण्यासाठी दबाव येत होता. मात्र वॉर्ड क्रमांक ५७ च्या नगरसेविका शोभा सोमनाचे यांचा एकच अर्ज महापौर पदासाठी दाखल झाला होता. त्यामुळे बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले.
 
मागच्या निवडणुकीचा अपवाद वगळता गेली अनेक वर्षे बेळगाव महानगरपालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता होती. गेल्या निवडणुकीत समितीचे तीन नगरसेवक निवडून आले. मात्र महापौर व उपमहापौरपदी मराठी भाषिकांचीच निवड झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावातील मराठी भाषिकांचे प्राबल्य सिद्ध झाले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे