Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बार्शी पोलिसांचा प्रताप हत्येच्या आरोपीसोबत हॉटेलात जेवण, सर्व कॅमेऱ्यात कैद

बार्शी पोलिसांचा प्रताप हत्येच्या आरोपीसोबत हॉटेलात जेवण, सर्व कॅमेऱ्यात कैद
, गुरूवार, 20 जून 2019 (10:11 IST)
सोलापूर येथे पुन्हा संताप करवणारी घटना घडली आहे. अनेक कारणावरुन वादात सापडणारे बार्शी पोलीस परत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यामध्ये आता हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतरही त्याची रवानगी पोलीस कोठडीत न करता बार्शी पोलीस त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये जेवण करत होते. हा सर्व प्रकार खासगी वृत्त वाहिनीच्या हाती लागला आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयितासोबत सार्वजनिक ठिकाणी जेवण करणाऱ्या या बार्शी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या बद्दल टीव्ही नाईन ने वृत्त दिले आहे. 
 
यातील प्रकरण असे की मागच्या वर्षी 29 ऑक्टोबर 2018 वेळी बार्शी येथे रहिवासी असलेला अंकुल उर्फ गोल्या चव्हाण हा त्याच्या घरी मुलीला खेळवत होता. त्याचवेळी  त्याच्यावर अज्ञात तरुणाने तलवारीने हल्ला केला आणि त्याची हत्या केली होती. या प्रकरणी बार्शी पोलिसांनी सुरज चव्हाण, दीपक माने, सुरज मानेसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला, या प्रकरणातील चार आरोपींना  अटक देखील केली. मात्र इतर आरोपी फरार आहेत. मृत अंकुल चव्हाणच्या नातेवाईकांनी उर्वरित फरार आरोपीच्या अटकेसाठी उपोषण केले, त्यानंतर पोलिसांवर दबाव वाढला आणि  किरण गुळवे या संशयिताला अटक केली. या अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी बार्शी न्यायालयात हजर केल होते, न्यायालयाने आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली. त्यानंतर या आरोपीची न्यायालयातून थेट पोलीस कोठडीत रवानगी होणे गरजेचे किंबहुना तसेच होणे अपेक्षित होते. मात्र, बार्शी पोलिसांनी संशयित आरोपी किरण गुळवे याला बार्शीतील एका हॉटेलमध्ये जेवण करायला नेले व त्याच्यासोबत एकाच टेबलावर बसून जेवणही देखील केले. बार्शी पोलिसांचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. आरोपीसोबत जेवण हे तर कायद्याचा अपमान असून या पोलिसांनवर कठोर कारवाई कारवाई अशी मागणी होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘गुगल मॅप्स' मध्ये आले ‘स्पीडोमीटर’ चे फीचर