Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
, बुधवार, 29 जुलै 2020 (09:04 IST)
पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्याचं सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केलं जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल. विभागीय आयुक्तांसह जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केला.
 
पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आज संध्याकाळी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जमाबंदी आयुक्त तथा ‘ससून हॉस्पिटल’चे समन्वयक एस. चोक्कलिंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हे देखील प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टुअर्ट ब्रॉड : युवराज सिंगच्या सहा षटकारांनी खचून न जाणारा विक्रमाधीश गोलंदाज