अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणा-या‘माध्यमदुत’ या माध्यमाधारित या कोर्सच्या तिसऱ्या Batch च्या उद्घाटनाचा कार्यक्रम(दि.१ सप्टेंबर रोजी) पार पडला. उत्तर महाराष्ट्रातील युवकांची माध्यमांची समज वाढवून त्यांना रोजगार मिळवुन देण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासुन अभिव्यक्तीत सुरु असलेल्या या माध्यमदूत कोर्सच्या 2 Batch यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या batch चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार आणि आकाशवाणीच्या निवेदिका मेघ बुरकुले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. एक उत्तम पत्रकार होण्यासाठी संवेदनशीलता सर्वात जास्त महत्वाची आहे. पत्रकारितेचे क्षेत्र खुप मोठे आहे. त्यात आपल्याला आपला धागा म्हणजे Beat निवडून पुढे जातं आलं पाहिजे. पत्रकारितेत शिकवली जाणारी पुस्तकातील माहिती आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यात खुप मोठी दरी असते. पण या माध्यमदूत कोर्समध्ये पुस्तकापेक्षा जास्त भर प्रात्यक्षिकावर देण्यात येत असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांमधून उत्तम पत्रकार नक्कीच निर्माण होऊ शकतात असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
माध्यमदूतच्या माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. त्यात अजिंक्य भावसार, गीतांजली घोंगडे, नितीन येवले,अपूर्व इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटनप्रसंगी अभिव्यक्तीचे संचालक नितीन परांजपे आणि माध्यमदूत चे संचालक भिला ठाकरे उपस्थित होते. भिला ठाकरे यांनी प्रास्ताविक तर अविनाश नेवे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.