Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 22 February 2025
webdunia

आरोग्य विद्यापीठातर्फे प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ

आरोग्य विद्यापीठातर्फे प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ
, शुक्रवार, 22 जून 2018 (17:12 IST)
होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी ‘आधुनिक औषधषास्त्र’अभ्यासक्रम 
 
राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी ‘आधुनिक औषधषास्त्र‘;प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.
 
विद्यापीठाचे मा. कुलगुरु दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की,‘आधुनिक औषधषास्त्र‘अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवाराची महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियमाअंतर्गत महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेषाकरीता उमेदवाराने विद्यापीठाकडे आनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे असे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेने दिलेल्या निर्णयानुसार प्रथम चाळीस हजार क्रमांकाच्या नोंदणी केलेल्या होमिओपॅथी वैद्यक व्यवसायिकांसाठी शैक्षणिक वर्ष 2018-2019 करीता प्रवेष प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमास राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यवसायीक प्रवेषाकरीता पात्र असतील. सदर अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा आहे.
 
या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक उमेदवाराने अर्जामध्ये महाविद्यालय प्रसंतीक्रमासाठी कमीत कमी एक व जास्तीत जास्त चोवीस प्राधान्यक्रम देणे बंधनकारक आहे. एकदा दिलेल्या पसंतीक्रमात नंतर कुठलाही बदल करता येणार नाही. महाराष्ट्र होमिओपॅथी व्यवसायी परिषदेकडे असणारी व्यवसाय नोंदणीची सेवा जेष्ठता क्रमांक प्रवेषाकरीता गुणवत्ता म्हणून विचारात घेण्यात येईल. या व्यतीरिक्त इतर कुठलीही गुणवत्ता विचारात घेतली जाणार नाही. सद्यस्थितीत राज्यातील चोविस महाविद्यालयांमध्ये प्रवेषाकरीता सदर प्रवेषप्रक्रिया राबविण्यात येत आहे. नवीन महाविद्यालये संलग्नित झाले अथवा प्रवेष क्षमतेत वाढ झाल्यास पात्र उमेदवारांकडून किंवा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रमाचे अर्ज मागविण्यात येतील.
 
विद्यापीठाचेसंकेतस्थळावर ‘आधुनिक औषधषास्त्र‘प्रवेषसंबंधी आवष्यक माहितीपत्रक उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहितीपत्रकात विहित नमुना अर्ज, प्रवेष प्रक्रिया शुल्क, अटी व शर्ती आदी बाबींची तपषीलवार माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.
 
राज्यातील मुंबईचे ग्रँट गव्र्हमेंट मेडिकल कॉलेज, ठाण्याचे राजीव गांधी मेडिकल कॉलेज, चिपणूणचे बी.के.एल. वाळवलकर मेडिकल कॉलेज, पुण्याचे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्याचे महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल एज्युकेषन अॅण्ड रिसर्च मेडिकल कॉलेज, मिरजचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूरचे डॉ. व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूरचे आष्विनी रुरल मेडिकल कॉलेज, इस्लामपूरचे प्रकाष इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च , धुळयाचे एस.बी.एच. वैद्यकीय महाविद्यालय, जळगांवचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, नाषिकचे एस.एम.बी.टी. मेडिकल कॉलेज, धामणगाव, औरंगाबादचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबेजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूरचे महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च मेडिकल कॉलेज, लातूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालनाचे इंडियन इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च मेडिकल कॉलेज, नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरचे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावतीचे डॉ. पंजाबराव देषमुख स्मृती मेडिकल कॉलेज, यवतमाळचे श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अकोल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सदर अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

’जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईल - शिवसेनेची मोदींवर जहरी टीका