Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर कुटुंबातील पाच जणांचा खुनी पालटकरला अखेर अटक

नागपूर कुटुंबातील पाच जणांचा खुनी पालटकरला अखेर अटक
, शुक्रवार, 22 जून 2018 (08:17 IST)
भाजपा कार्यकर्ते कमलाकर पवनकर यांच्या कुटुंबातील ४ जणांचा आणि पोटच्या मुलाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या विवेक पालटकरला अखेर अटक केली आहे. त्याने काही दिवसांपूर्वी राक्षशी कृत्य केले होते.यामुळे मुख्यमंत्री यांचे नागपूर शहर हादरले होते. पंजाबमधील लुधियानातून त्याला अटक करण्यात आली आहे.  विवेक पालटकरने ११ जूनच्या मध्यरात्री कमलाकर पवनकर, पत्नी अर्चना, आई मीराबाई, मुलगी वेदांती आणि भाचा कृष्णा (विवेक पालटकरचा मुलगा) यांचा आरोपी खून केला होता. हत्याकांडानंतर तो फरार होता. त्याने खोलीवर जाऊन रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि नंतर ट्रकचालकाला लिफ्ट मागत तो राज्याबाहेर पळून गेला. हे हत्याकांड आधी राजकीय द्वेषातून झाले अस वाटले होते, मात्र निघाले विपरीत.
 
विवेक पालटकर याने त्याच्या पत्नीची हत्या केली होती. तो जेमधअये गेल्यानंतर त्याच्या मुलाचा सांभाळ पवनकर कुटुंबीयच करीत होते. तो पेरोलवर बाहेर होता. फुकट खाणे आणि अय्याशी करणे अशी सवय त्याला होती, यापूर्वी त्यांने खून करत अमृतसर गाठले आणि सुवर्णमंदिरातील लंगरमध्ये जेवणाची सोय करून घेतली होती. हा पुन्हा पंजाबमध्येच पळाला असण्याची शक्यता लक्षात घेऊन तपास सुरु केला. विवेकने नवं सिमकार्ड घेतलं मात्र मोबाईल जुनाच वापरत होता, ज्यामुळे नवीन सिम मोबाईलमध्ये टाकताच त्या ठावठिकाणा पोलिसांना कळाला. पोलिसांनी एकही क्षण न दडवता विवेकला अटक केली आहे. त्याने हे सर्व अघोरी शक्तीसाठी केले असे तो सांगत आहे, मात्र त्याने पैसे पाहिजे या वादातून खुन केला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औरंगाबादचा समाधान दौड पीएसआय परीक्षेत राज्यात पहिला