Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घाटकोपर मध्ये ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

mumbai rain
, शनिवार, 31 डिसेंबर 2022 (15:11 IST)
मुंबई येथील घाटकोपर परिसरामध्ये ब्रिटिशकालीन जलवाहिनी पहाटे २.३० वाजच्या दरम्यान फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच, आजूबाजूच्या घरांचे आणि दुकानांचे पूर आला असे  प्रचंड नुकसान झाले आहे. घाटकोपरमध्ये असल्फा विभागात जलवाहिनी फुटल्याने रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झालं आहे. जलवाहिनी फुटल्याने 400 घरांत पाणी शिरले आहे.
 
असल्फा विभागात ब्रिटीशकालीन 72 इंचाची जलवाहिनी आहे. ब्रिटिशकालीन असल्याने ही जलवाहिनी अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे सातत्याने ही जलवाहिनी फुटत असते. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना सतत मनस्तापाला समोरे जावे लागते. 30 डिसेंबर रोजी रात्री अचानक जलवाहिनी फुटल्याने नागरिक घाबरले होते. पाण्याचा प्रवाह इतका होता की अनेक घरात पाणी शिरले. रस्ते जलमय झाले. 10 फुटापर्यंत या जलवाहितून पाणी उसळत होते इतका पाण्याचा दाब होता.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेमविवाह केल्याचा राग चाळीत राहणाऱ्या काही तरुणांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न