राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे.कुठे तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर कुठे खड्ड्यात चारचाकी पडून अपघात झाले आहे. या दरम्यान बीड मधून एका बातमी येत आहे. बीड मध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे त्यामुळे या पावसात भिजून तब्बल 15 हजार क्विंटल साखर भिजल्याचे वृत्त समोर आले आहे.
ही घटना आज दुपारी घडली जोरदार पाऊसामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात आनंदगाव(सारणी) येथे येडेश्वरी साखर कारखान्यात पाणीच पाणी झाल्यामुळे कारखान्यातील गोदामात पाणी शिरले आणि कोटयावधी रुपयाची 30 हजार पोते साखर पाण्यात भिजून नुकसान झाले.
कारखान्याच्या गोदामात पाणी शिरले पाणी काढायला कमीत कमी 40 ते 50 कामगार प्रयत्न करीत होते .असे गोदाम व्यवस्थापकांनी सांगितले .