मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या विंचूर येथे रस्त्याकामाचे भूमी पूजनच्या कार्यक्रमाला आले होते. या वेळी त्यांनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली त्यांच्या भाषणाच्या मध्ये जवळच्या मंदिरात वाजणाऱ्या हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती केली. ते म्हणाले, या आवाजामुळे मला भाषण देता येत नाही
पोलीस निरीक्षकांनी याची तात्काळ दखल घ्यावी. मी स्वतः बजरंग बलीचा भक्त आहे. त्यांच्यामुळेच हे सर्व काम होत आहे.
छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. दरम्यान, हनुमानाची आरती सुरू झाली आणि हनुमान चालिसाचा मोठा आवाजही येऊ लागला. आधी छगन भुजबळ यांना काही समजले नाही.त्यावेळी त्यांनी मंदिर प्रशासनाला आवाज कमी करण्याची विनंती केली. या वेळी ते म्हणाले, मी देखील बजरंगबलीचा भक्त आहे.
पण या आवाजामुळे मला नीट भाषण देता येत नाही आहे. कृपया आवाज जरा कमी करा अशी विंनती केली. नंतर भाषण संपल्यावर त्यांनी मंदिर प्रशासनाचे विनंती स्वीकारण्याबद्दल आभार मानले.