सध्या राज्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. बिबटे मानवी वस्तीत जाऊन नागरिकांवर हल्ले करत आहे. नागरिकांमध्ये भीतीची स्थिती आहे. हे बिबटे लहान मुले, वृद्धांना बळी करत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात दररोज नागरिक जखमी होते आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र जुन्नर तालुका, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि मुंबईलगतचे भाग, मराठवाड्यात आणि विदर्भात बिबट्यांची आणि वाघांची दहशत आहे.
राज्य सरकारने बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यावर कोणतीही कारवाई न होत असल्याने या विरोधात आवाज उठवण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभेत चक्क बिबट्याचा पोशाख परिधान करून प्रवेश केला. त्यांच्या अशा स्वरूपाची नागपूरात होत असलेल्या अधिवेशनात चांगलीच चर्चा झाली.
आमदार शरद सोनावणे म्हणाले, राज्यात 9 ते 10 हजार संख्या बिबट्यांची आहे. बिबट्यांचे वास्तव्य वाढत आहे. गेल्या 3 महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जुन्नर तालुक्यात 55 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
राज्य सरकार बिबट्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी महिलांना आणि मुलांना शेतकऱ्यांना लोखंडी पट्टे मानेला लावण्याचा सल्ला देत आहे. पण बिबट्यांना पकडण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाही.
आमची मुले रस्त्यावर खेळू शकत नाही. घराभोवती बिबट्यापासून वाचण्यासाठी विद्युत तारेचे कुंपण लावण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकार ने राज्यात 2 हजार बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर येत्या 3 महिन्यांत तयार करावे. नर आणि मादी बिबट्यांना वेगळे करा. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार ने दोन रेस्क्यू सेंटर तातडीने जुन्नर तालुक्यात सुरु करावे.एक रेस्क्यू सेंटर अहिल्यानगर येथे देखील करावे.
बिबटे आता दिवसा देखील महिलांवर व पुरुषांवर हल्ले करतात,” असे सांगत त्यांनी सरकारला बिबट्यांच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याची मागणी केली.एकही शेतकरी किंवा त्यांची मुलं आता बिबट्यांच्या हल्ल्यात मरू नयेत,” असा कडक इशाराही त्यांनी दिला.येत्या 90 दिवसात रेस्क्यू सेंटर तयार करा आणि पुढे एकही बिबट्या मुक्त फिरणार नाही अशी व्यवस्था करा अशी मागणी सोनवणे यांनी केली.