Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला पहाटे भीषण अपघात,प्रकृती स्थिर

webdunia
, शनिवार, 24 डिसेंबर 2022 (21:01 IST)
साताऱ्यातील माण खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला पहाटे भीषण अपघात झाला, गोरे यांच्यासह 4 जण त्या गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात गोरे यांच्यासह त्याचे सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत, तर त्यांच्या चालक आणि अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आमदार गोरे यांच्यावर आता पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार गोरे यांच्या छातीला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉल रुग्णालयातील न्युरो ड्रॉमा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल गंगाधर झिरपे यांनी दिली आहे.
 
डॉ. झिरपेंनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार गोरे यांना रुबी हॉल रुग्णालयाला सकाळी सात वाजता दाखल करण्यासाठी आणले जात आहे, असे कळवण्यात आले. सकाळी 7.45 ला ते रुग्णालयात पोहचले. यावेळी डॉक्टरांच्या टीमने तातडीने त्यांच चेकअप केलं. सुदैवाने आमदार जयकुमार गोरे यांना कोणताही गंभीर जखमी झाली नाही, ते शुध्दीवर आहेत, बोलत आहे. त्यांचे सर्व पल्स, बीपी व्यवस्थित आहे. त्यांना छातीला डाव्या साईडला मुका मार बसला आहे. त्यावर व्यवस्थित उपचार सुरु आहेत. ते आऊट ऑफ डेंजर आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही, असं डॉ. झिपरे म्हणाले आहेत. पेनकिलर दिल्यानंतर आराम पडला असून ते बोलत आहेत, अशी माहिती डॉ. झिरपे यांनी दिली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार पत्रकारांवर भडकले, म्हणाले काड्या पिकवण्याचे काम करू नका…