पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तींना पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती मनसेकडून पोलिसांना दिली जाणार आहे.
घुसखोरांविषयी माहिती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. तिथे गुप्त पद्धतीने माहिती देण्याचीही सोय असेल. माहिती खरी ठरल्यास संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा औरंगाबाद मनसेकडून करण्यात आली आहे.