Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक विधान केलं शिंदे गटासोबत युती

sandeep deshpande
, बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (15:53 IST)
भाजपा नेते राज ठाकरेंची भेट घेत असल्याने ही वाढती जवळीक पाहता लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त होती होती. पण यादरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक विधान केलं आहे. राज ठाकरे यांनी सर्व पालिकांच्या निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
 
संदीप देशपांडे यांना मनसेच्या बैठकीसंबंधी विचारण्यात आलं. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शिंदे गटासोबत युती करणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “ही पक्षाची अंतर्गत विषयासंबंधी बैठक होती. तिथे काय चर्चा झाली हे माध्यमांसमोर सांगू शकत नाही. शिंदे गटासोबत युती करण्यासंबंधीच्या बातम्या आम्हीही पाहत आहोत. पण राज ठाकरेंच्या आदेशानुसार मुंबई, नवी मुंबई, संभाजीनगर किंवा इतर महापालिकांच्या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व जागा लढवण्याची तयारी करत आहेत”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लेसर शो मुळे कोल्हापूर शहरात ६३ जणांच्या डोळय़ाला इजा