Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे नेते नितीन सरदेसाई यांची ईडीकडून चौकशी

मनसे नेते नितीन सरदेसाई यांची ईडीकडून चौकशी
, गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (16:02 IST)
कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई गुरूवारी दुपारी ईडीच्या कार्यालयात दाखल हजर झाले आहेत.
 
अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात तपास करत आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील ‘सेना भवन’ समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'एवढे खोटारडे पंतप्रधान, मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत'