Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर ‘तुमचे गोडाऊन आमचे लॉक’ मनसेचा अॅमेझॉन ला इशारा

तर ‘तुमचे गोडाऊन आमचे लॉक’ मनसेचा अॅमेझॉन ला इशारा
, शुक्रवार, 3 जुलै 2020 (22:29 IST)
अमेझॉन कंपनीने मेगाभरतीच्या ऑनलाइन प्रक्रियेत मराठी भाषा वगळ्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पक्षाच्या रोजगार विभागाने जाहिरात प्रक्रियेत इतर भाषांबरोबर मराठी भाषेचाही तत्काळ समावेश करण्यात यावा अशा आशयाचे लेखी पत्र कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाला (कस्टमर सर्व्हिस) पाठवले असल्याचे मनसे रोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी सांगितले.
 
अमेझॉनने ही ऑनलाइन सेवा पुरवणारी कंपनी त्यांच्या वी.सी.एस work from home options यात भरती करत असून देशातील विविध ठिकाणी सेवा केंद्र उघडत असताना पुण्यात देखील उघडणार आहे. असे असताना इतर भाषेंमध्ये नोकरीसाठी नोंदणी फॉर्म भरण्यासाठीचे पर्याय खुले आहेत. मात्र महाराष्ट्राची राजभाषा असणाऱ्या मराठीला वगळण्यात आल्याने मनसेने कंपनीला पत्र लिहून जाब विचारला आहे. येत्या सात दिवसात मराठी भाषेचा समावेश करा, तसे न केल्यास ‘तुमचे गोडाऊन आमचे लॉक’ असा सज्जड इशाराही मनसे रोजगार अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

३१ जुलै पर्यंत व्यावसायिक उड्डाणांवर बंदी