मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला असून येत्या 31 मे पर्यंत केरळ राज्यात पोहोचण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गेल्या वर्षी मान्सून ने 19 मे रोजी अंदमान -निकोबार मध्ये धडक दिली असून केरळ मध्ये 8 जाऊन रोजी पोहोचला होता. यंदा मान्सुन 31 मे रोजी केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून यंदा 9 ते 16 जून दरम्यान मान्सून येण्याची शक्यता आहे.
मान्सून यंदा 28 मे ते 3 जून पर्यंत केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागानुसार, मान्सून साधारणपणे केरळ मध्ये 1 ते 5 जून दरम्यान दाखल होतो. केरळ मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मान्सून अंदमान निकोबार बेटांवर येतो. या वर्षी मान्सून आधीच आला आहे.
यंदाच्या वर्षी ला नीना मुळे पाऊस चांगला होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रात यंदा मान्सून 11 जून ला दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस येत आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक मान्सून येण्याची वाट पाहत आहे.