महाराष्ट्रातील आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील रुग्णालयात प्रसूती दरम्यान एका 31 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
सदर घटना विक्रमगड तालुक्यातील गलातारे गावात एका 31 वर्षीय महिलेला मंगळवारी प्रसूती वेदना सुरु झाल्या.महिलेला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असता तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या असता हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात तिचा आणि बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला.
नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असून तिला नंतर शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले मात्र तिचा बाळंतपणाचं मृत्यू झाला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी महिलेची प्रकृती चांगली होती. तिला प्रसूतिवेदना देखील सुरु झाल्या मात्र प्रसूती दरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला मात्र बाळ देखील दगावले.मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.