आज बीडमध्ये भेंड टाकली तांडा येथे गौरी आगमनाच्या दिवशी एक आई आणि दोन मुलांचा विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ललिता श्रीकांत राठोड(30), प्रशांत श्रीकांत राठोड (11), आणि अभिजित श्रीकांत राठोड अशी मृतांची नावे आहेत.
बीडमध्ये टाकली तांडा येथे श्रीकांत राठोड कुटुंबावर शोककळा पसरली या कुटुंबात श्रीकांत राठोड यांची पत्नी आणि दोन मुलांना विद्युत वाहक तारेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला असून या परिसरात शोककळा पसरली आहे.