जालना जिल्ह्यातील घुंगर्डे हादगाव येथे एका महिलेनं आपल्या 4 पोटच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली तेव्हापासून परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबीक वादातून महिलेनं हे धक्कादायक पाऊल उचल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पाचही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पती ज्ञानेश्वर अडाणीला ताब्यात घेतलं आहे. गंगासागर अडाणी असं आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे तर 13 वर्षीय भक्ती, 11 वर्षीय ईश्वरी, 9 वर्षीय अक्षरा आणि 7 वर्षीय मुलगा युवराज अशी मयतांची नावं आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.