अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या दुरंगी लढतीत शशिकला शिवाजी पवार (Shashikala Pawar) विजयी झाल्या. शशिकला पवार या किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई आहेत.
शशिकला पवार अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी प्रतिस्पर्धी सुशीला उत्तम पवार यांचा 227 मतांनी पराभव केला. शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. शशिकला पवार कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप समोर आलं नाही.
Edited By - Ratnadeep Ranshoor