Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’प्रवेश केला

shivsena logo
, शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (07:45 IST)
ठाकरे गटात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर, राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तर, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. मागील काही दिवसांपासून गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होता. गोरेगाव येथे ठाकरे गटाच्या मेळाव्यात आणि दसऱ्याला बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करून चूक केली, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता.
किर्तीकर यांनी यापूर्वी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने आता गजानन किर्तीकर हे शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका मांडताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, आता पुन्हा चूक नको असा सल्लाही जाहीरपणे दिला होता. त्यामुळे, ते शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा रंगली. तत्पूर्वी, खासदार किर्तीकर हे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनालाही गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, पुन्हा एकदा किर्तीकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा जोर धरत आहे.  
 
ऑपरेशननंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
 
कीर्तिकर यांचे उजव्या पायाचे दि,१३ जुलै रोजी माहिम येथील रहेजा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले होते. त्यामुळे दि,२१ जुलैला  दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कीर्तिकर यांच्या गोरेगाव ( पूर्व )आरे रोड येथील स्नेहदीप सोसायटी येथील निवासस्थानी भेट देवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली-भुवनेश्वर विमानात प्रवाशाची प्रकृती खालावली, वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग