Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता चोवीस तास सुरू राहणार मुंबईतील दुकाने, हॉटेल्स!

आता चोवीस तास सुरू राहणार मुंबईतील दुकाने, हॉटेल्स!
मुंबई , शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:05 IST)
मुंबईतील दुकाने, हॉटेल्स तसेच इतर आस्थापना चोवीस तास उघडी ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधीचे विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले.
 
दुकाने, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या जागा व इतर अस्थापना यातील नोकरीच्या शर्तींचे आणि त्यात नोकरीवर ठेवलेल्या कर्मचा-यांच्या इतर सेवा शर्तींचे विनियमन करण्यासाठीचे हे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.
 
या अधिनियमानुसार दहापेक्षा कमी कर्मचारी काम करीत असणा-या प्रत्येक अस्थापनेचा मालकाला धंदा सुरू केल्याच्या 60 दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करून स्वयं-घोषणापत्र, स्वयंप्रमाणित कागदपत्रे सादर करून नोंद करणे आवश्‍यक राहणार आहे. त्याचप्रमाणे दुकाने, व्यापारी संकुल किंवा मॉल उघडण्याच्याकिंवा बंद करण्याच्या वेळा निश्‍चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेंकय्या नायडू बनले उपराष्ट्रपती