Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

गणपती मंडपांच्या परवानगीसाठी मुदतवाढ

mumbai highcourt
, गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (16:07 IST)
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत सरकारने 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अद्याप मंडपांना परवानगी न मिळालेल्या मंडळांना 5 सप्टेंबरपर्यंत परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. 
 
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या आगमनाला आता केवळ पंधरवडा उरला आहे. मात्र अद्यापही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार या वर्षी गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही प्रकिया संथगतीने सुरू असल्याने अर्जाची मुदत  तिसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. यापूर्वी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारकडून JEE आणि NEET साठी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी