ऐतिहासिक अशा नोटबंदीनंतर आरबीआयकडे परत करण्यात आलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटांची तपासणी व नोंदणी करण्याचे काम संपल्याचे आरबीआयने जाहीर केले असून बाद केलेल्या एकूण नोटांपैकी 15.30 लाख कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. याबाबत नोटा तपासणी व नोंदणीचे काम अखेर संपल्याचे आरबीआयने अहवालात म्हटले आहे.
मार्च 2018 अखेरीस भारतीय बाजारपेठेमध्ये 18 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य 37.7 टक्क्यांनी वाढून 18.04 लाख कोटी रुपये झाल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. तर केवळ नोटांच्या संख्येचा विचार केला तर ही वाढ दोन टक्क्यांची आहे. जास्त किमतीच्या म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यामुळे प्रत्यक्ष नोटांच्या संख्येतील वाढ 2 टक्क्यांची आहे.