Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेमध्ये वाहनांचा वेग रोखला जाईल

expressway
, सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (15:06 IST)
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि निर्धारित लेन न सोडण्यासाठी आधुनिक वाहतूक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने (MSRDC) सुरक्षिततेसाठी  इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) सारख्या अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. ..
 
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर रोड अपघातात माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. अशा परिस्थितीत रस्ता सुरक्षा प्रणालीसंदर्भात प्रश्न उद्भवले 94कि.मी. अंतराच्या या मार्गावर, घाट रोड, बोगद्यामुळे, अचूक अंदाज येत नाही आणि वेगवान वाहनांचा अपघात होतो. रस्त्याच्या कडेला वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होते. जड आणि मोठ्या वाहनांमुळे वळण घेण्यास  समस्या निर्माण करतात. हे लक्षात घेता, आधुनिक रहदारी प्रणाली लागू केल्या जातील.
 
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS प्रणालीसाठी 160 कोटी रुपये  खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर वाहतूक शिस्तीचे पालन व्हावे, अपघात टाळता यावेत, अपघात झाल्यास  तातडीने मदत मिळावी आणि टोल वसुली जलद, अचूक व पारदर्शक व्हावी यासाठी या मार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर .आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे.  या मार्गावर 39 ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे वाहनांचा वेग तपासणारी यंत्रे सरासरी वेग ओळखणारी यंत्रणा,तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा माग काढण्यासाठी ..34 ठिकाणी लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम बसविण्यात येणार आहे .त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.  ..
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rain Update: राज्यात पावसाची दमदार हजेरी