गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईकरांसाठी महिन्याची २९ तारीख अशुभ ठरत आहे. या दिवशी मोठे अपघात, नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बरोबर महिन्याभरापूर्वीच्या अर्थात २९ ऑगस्टला प्रचंड पाऊस सुरु झाला. मुसळधार पावसाने त्यादिवशी विविध घटनांमध्ये १० मुंबईकरांचा जीव घेतला.
२९ ऑगस्टच्या सकाळी १० च्या सुमारास घरातून निघालेले लोक ट्रेनमध्ये सहा ते सात तासांपेक्षा जास्तवेळ अडकले. ट्रॅकवर पाणी साठले. ट्रेन बंद झाली. अनेक मुंबईकरांना घर गाठणे अशक्य झाले.
आता मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 39 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे.