बल टेंडर काढण्यासाठी पालिकेला राज्य सरकार परवानगीची गरज नसते. पालिकेने स्वत: टेंडर काढायचे असतात. मुंबई महापालिकेनेही ग्लोबल टेंडर काढले आहे. पुणे पालिकेचे गटनेते चुकीची माहिती देत आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
लसीकरणाच्या नावाखाली राज्य शासनाला बदनाम करून राजकारण करू नये असा सज्जड दम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भरला. महापालिकेस लस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाच्या कोणत्याही परवनगीची गरज नाही. असे स्पष्ट करत सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा त्यांनी खोडून काढला.
पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी पुणे महापालिकेला लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी राज्य सरकारची परवानगी गरजेची आहे. मुंबई महापालिकेने आपल्या स्तरावर ग्लोबल टेंडरचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार परवानगी देत नाही असं नाही. पण मुळात लसच उपलब्ध नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.