Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेंगळुरूच्या विद्‌यार्थ्याची खंडणीसाठी “बेस्ट्‌ फ्रेंड’ने केली हत्या

बेंगळुरूच्या विद्‌यार्थ्याची खंडणीसाठी “बेस्ट्‌ फ्रेंड’ने केली हत्या
बेंगळुरूच्या तळ्याजवळ एका कॉलेज विद्‌यार्थ्याचा मृतदेह पोलीसांना सापडला आहे. या शरद नावाच्या या विद्‌यार्थ्याने काही दिवसांपूर्वीच आपले अपहरण करण्यात आलेले असून ताबडतोब 50 लाख रुपये पाठवावेत असा त्याच्या वडिलांना-निरंजन कुमार यांना व्हाट्‌सऍपवर मेसेज पाठवला होता. या प्रकरणात पोलीसांनी चार अपहरणकर्त्यांना अटक केली असून त्यात शरदचा “बेस्ट्‌ फ्रेंड’ विशालही आहे. शरदच्या अपहरणकर्त्यांनीच पोलीसांना शरदच्या पुरलेल्या मृतदेहाची जागा दाखवली आहे.
 
12 सप्टेंबरला शरद आणि त्याचा “बेस्ट फ्रेंड’ विशाल शरदच्या नवीन बाईकवरून जात होते. त्यावेळी स्विफ़्ट डिझायर गाडीतून्‌ आलेल्या काहीजणांनी शरदचे अपहरण केले. त्याच रात्री विशाल आणि त्याच्या साथीदारांनी शरदची हत्या केली. मात्र त्यापूर्वी वरिष्ट आयकर अधिकारी असलेल्या शरदच्या वडिलांना 50 लाख रुपये खंडणी देण्यासाठीचा व्हाट्‌सऍप व्ह्डियो त्याला पाठवयला सांगितला. न पाठविलेला आणखी एक व्हिडियो शरदच्या मोबाईलमध्ये मिळाला आहे. माझ्यानंतर माझ्या माझ्या बहिणीचे अपहरण हे लोक करणार आहेत, असे त्यात म्हटले होते.
 
विशाल आणि त्याच्या साथीदारांनी नॉयलॉन दोरीच्या फासाने शरदचा जीव घेऊन त्याचा मृतदेह तळ्यात टाक़ून दिला. तो फुगून वर आल्यानंतर बाहेर काढला आणि दगड बांधून पुन्हा तळ्यात टाकला. नंतर तो मृतदेह एका गोणत्यात घालून तळ्याजवळच जमिनीत पुरून टाकला, असे पोलीसांनी सांगितले.
शरदचे चिंतातुर कुटुंबीय शरदची वाट पाहत असताना विशाल त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहिला होता. मोबाईलवरील रेकॉर्डमुळे विशालचा गुन्ह्याशी असलेला संबंध उघड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महागाईप्रश्नी शिवसेना आक्रमक, मुंबईत विभागवार 12 मोर्चे काढणार