Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घर मालकाला भाडेकरुसोबतचे अनैतिक संबंध जीवावर बेतले!

crime news
गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (08:57 IST)
घर मालकाला आपल्या भाडेकरू विवाहितेसोबत सोबत अनैतिक संबं संबंध ठेवणे जीवावर बेतले असून विवाहितेच्या पतीने घरमालकाची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली असून घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद सुरेश शेट्टी (वय ३३) असे मृत घरमलकाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद सुरेश शेट्टी हे मेहरून परिसरात राहतात. दोन दिवसांपासून प्रमोद शेट्टी बेपत्ता होता. त्यामुळे प्रमोदच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रमोदचा शोध घेतला. दरम्यान प्रमोदचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावर आढळून आला होता. पोलिसांनी प्रमोद मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता प्रमोदची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते.
 
एमआयडीसी पोलिसांनी आपली चक्र फिरवत घटनेची चौकशी करत पाळेमुळे खोदून काढत घटनेचा छडा लावला. दरम्यान, पोलिसांनी संशयीतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयित सुनील लियामतखा तडवी (वय. २६) आणि सत्यराज नितीन गायकवाड जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले होते. पोलिसांनी तेथून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
 
खुनाची दिली कबुली
एमआयडीसी पोलिसांनी दोघा संशयतांना ताब्यात घेतले त्यांना पोलीस खाक्या दाखवतात. त्यांनी खुनाची कबुली दिली. सुनील तडवी हा प्रमोद यांच्या घरात भाड्याने राहतो. त्याच्या पत्नीसोबत प्रमोद याचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता या कारणावरून तडवी याने सत्यराजाला सोबत घेत प्रमोद याचा खून केला. असा कबुली जबाब दोघा संशयतांनी एमआयडीसी पोलिसांना दिला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक मनपाचा लाचखोर कर्मचारी जाळ्यात; रस्ता खोदण्यासाठी मागितले २४ हजार रुपये