वर्धा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करून त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याने त्याचा मृत्यू झाला. बालकाचा खून करण्यापूर्वी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्या गेल्याचा प्रकार घडला आहे.
आनंदनगर पाकिजा कॉलनी परिसरात आठ वर्षाच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणी पोस्को कायद्यानुसार तसेच खूनाचे गुन्हे दाखल केले.
मृत्यू झालेल्या बालकाच्या घरा शेजारीच राहणाऱ्या एका नराधमाने युवकाने हा क्रूर गुन्हा केला असल्याचे उघड झाले आहे. बालक ओरडत होता म्हणून आरोपीने त्याचा गळा दाबून खून केला. नंतर बालकाचा अर्धनग्न स्थितीतील मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून दिला.
ही बाब लक्षात आल्यावर परिसरातील लोकांनी आरोपीस बेदम मारहाण केली. रात्री शवविच्छेदन झाल्यावर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील वातावरण अत्यंत तापलेले आहे. त्या नराधमाला त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.