मुठा कालवा फुटल्याने नागरिक भयानक संतापले आहे. पुण्यात फक्त आणि फक्त त्या कालव्याची चर्चा आहे. नागरिकांनी मनपा आणि सरकारला काही प्रश्न केले आहेत. मुठा कालवा जर रात्री फुटला असता तर काय केले असते असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत. गुरुवारी सकाळी दांडेकर पुलाजवळील मुठा नदीचा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटून काही मिनिटात पाण्याचा मोठा प्रवास दांडेकर पुलाजवळील रहिवासी झोपडपट्टी भागात वेगात शिरला होता, त्यामुळे सारे होत्याचे नव्हते झाले आहे. हा प्रकार इतक्या वेगात झाला की, एकमेकांना हात देऊन नागरिक बाहेर निघाले आहे. तर पाण्यात आणि घरात अडकलेल्या अडकलेल्या अनेकांना अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने काढले. यात स्थानिक नागरिक सोबत असल्याने अरुंद गल्ल्या, बोळी आणि घरे अग्निशमन दलाला सापडली.मात्र ही दुर्घटना रात्री घडली असती तर काय झाले असते असा सवाल स्थनिक नागरिक विचारत होते. झोपडपट्टीत राहणारे माणसेही माणसेच आहेत. त्यांनाही जीव आहेत. असा कालवा जवळ असताना पाटबंधारे विभाग काहीही करत नसेल तर मात्र आमचे जीव काहीच किंमतीचे आहे का असा संतप्त सवाल विचारला आहे. सुमारे 18 वर्षांपूर्वी इथे भिंत बांधण्यात आली होती. आज आलेल्या पाण्यामुळे भिंत निम्मी वाहत गेली. त्यामुळे कुठली भिंत आणि कसले घर असा प्रश्न इथले रहिवासी विचारत आहेत..