Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य
, रविवार, 22 सप्टेंबर 2024 (11:54 IST)
केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी दावा केला की त्यांनी आणि त्यांच्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीची वीज बिले भरली नाहीत. आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, मी एक शेतकरी असून माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी आणि मी कधीही शेतीचे वीजबिल भरले नाही.माझ्या आजोबांचे पाण्याचे पंप अजूनही आहेत. 
 
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सुरु केलेल्या शेती वीज बिल माफी योजनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य दिले. या वेळी बोलताना  ते म्हणाले, आमच्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही. डीपी जळाला की दोन दोन हजार रुपये इंजिनिअरला देऊन नवीन डीपी बसवून घेतो. 

राज्य सरकार ने लाखोंचे वीजबिल माफ करण्याचे मोठे कार्य केले. नाहीतर लोड शेडींगमुळे रात्री शेतात जावे लागत होते. आता दिवसात देखील वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बऱ्याच प्रमाणात काळजी मिटली आहे .
 
प्रतापराव जाधव यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना सांगितले की, दोन समविचारी बैल जेव्हा शेतीत सामील होतात तेव्हा शेती चांगली होते, तसेच सरकारही चांगले होते. केंद्र आणि राज्य सरकारची विचारसरणी समान असेल तेव्हा विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक खासदार आणि प्रत्येक विभागावर बारीक नजर ठेवून आहेत.
 
सध्या राज्यात 46 लाखांहून अधिक कृषी पंप असून, सरकार 7.5 एचपीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देणार आहे. अर्थसंकल्पात घोषणा करताना अजित पवार म्हणाले होते की, या निर्णयाचा फायदा 44 लाख सहा हजार शेतकऱ्यांना होणार आहे.
 
सध्या कृषी ग्राहकांना सुमारे दीड रुपये प्रति युनिट दराने बिल दिले जाते. अशा स्थितीत वर्षाला सुमारे सहा हजार कोटी रुपयांची बिले पाठवली जातात, त्यापैकी केवळ पाच टक्के म्हणजे 280-300 कोटी रुपयांपर्यंतची बिले मिळतात. काही काळापूर्वी हे प्रमाण 8-10 टक्क्यांपर्यंत पोहोचले होते, त्यामुळे सध्या 95 टक्के कृषी पंपाची बिले वसूल होत नसून वीज पुरवठा मोफत केला  जात आहे.
  Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण होणार, लवकरच येणार!