सध्या राज्यातील विविध केंद्रांवर तब्बल चार वर्षांनंतर तलाठी भरतीची परीक्षा सुरु आहे. तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट पासून सुरु झाली असून परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची बातमी आली. त्यांनतर गोंधळ सुरु झाला.
आता नागपूरच्या एमआयडीसी परिसरातील तलाठी परीक्षा केंद्राच्या बाहेर गोंधळ सुरु आहे. आज सोमवारी सकाळी तलाठी भरती साठी परीक्षा देण्यासाठी उमेदवार परीक्षा केंद्रावर आले असून सर्व्हर डाउनच्या त्रासाला समोर जावे लागले त्यामुळे सकाळी 9 वाजता पेपर सुरु होणार होता. पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे 9 वाजे नंतर देखील उमेदवार परीक्षा केंद्राच्या बाहेरच होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
यंदा दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा साठी अर्ज केला आहे. तलाठी भरती परीक्षा गुरुवार 17 ऑगस्ट पासून सुरु झाली आहे. मात्र आज अमरावती आणि नागपूर परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.