राज्यातील लाठी चार हजार ६४४ पदासाठी राज्यातून सुमारे साडेबारा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र. त्यापैकी शुल्क भरलेले १० लाख ४२ हजार उमेदवार हे परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. पात्र उमेदवारांच्या परीक्षा शुल्कातून राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ९७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.
तलाठी पदाच्या परीक्षेसाठी १७ जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्याच्या काही भागात वीजपुरवठा खंडीत झाल्याने किंवा तांत्रिक कारणास्तव अनेकांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, काल, २५ जुलैपर्यंत परीक्षा भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. अर्ज भरण्यासाठी खुला गटासाठी एक हजार तर इतर गटासाठी ९०० रूपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले होते.