नायब तहसिलदाराच्या पत्नीचे हातपाय बांधून बंदुकीचा धाक दाखवत तब्बल ५ लाखांचे दागिने पळवल्याची घटना अमरावती शहरात उघडकीस आली होती. शहरातील राठी नगरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून पोलिसांनी अवघ्या ६० तासात प्रकरणाचा तपास करत ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती येथील राठी नगरातील भरदिवसा झालेल्या चोरी प्रकरणाचा 60 तासात पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देशी कट्टा व चाकू जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे घटनेतील मुख्य आरोपी नायब तहसिलदाराच्या घरीच चालक म्हणून करत असल्याचे समोर आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन आरोपी घटनेच्या दिवशीच कैद झाले होते. त्याच अनुषंगाने तपासासाठी 8 पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. यात 100 सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी केल्यावर पोलिसांनी आरोपींना अटक केली.
दरम्यान, मराठा सर्व्हेच्या नावाखाली नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरात घुसून लूट केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी आम्ही जनगणना करायला आलो आहोत, तुमचे आधारकार्ड दाखवा असे म्हणत जयश्री अडसुळे यांना बंदुकीचा धाक दाखवत ही लूट करण्यात आली होती. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Edited By - Ratnadeep ranshoor