श्री संत भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी महंत शास्त्रीजी म्हणाले की, भाषणाचा वाद हा केवळ श्री क्षेत्र भगवानगडापुरता मर्यादित होता. भगवानगड भाषणमुक्त झाल्यामुळे तो विषय आता संपलेला आहे. यावेळी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, मी नेता म्हणून नव्हे तर बीड जिल्ह्याची लेक म्हणून या सप्ताहाला आले आहे असे सांगितले. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनीं देखील गडासंदर्भातील आपली भूमिका मांडली.