Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी SC मध्ये जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणाले

nana patole vijay
, बुधवार, 11 डिसेंबर 2024 (15:33 IST)
ईव्हीएमवर सध्या विरोधकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत  ईव्हीएमच्या पारदर्शकतेबद्दल वाढलेल्या भीती आणि निवडणूक गैरप्रकारांच्या आरोपांदरम्यान विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मतदान प्रक्रियेत उत्तरदायित्व आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे वारंवार आग्रह केला आहे.
 
नागपुरात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून खळबळ माजली आहे. नागपुरातील काँग्रेसचे नेते नाँपाटोळें आणि विजयवडेट्टीवार यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली आहे आणि आम्हाला ईव्हीएम वर अजिबात विश्वास नसल्याचे म्हणाले. आणि आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात चौकशी करण्याची मागणी  आहे. 
ईव्हीएमबाबत विरोधक सुप्रीम कोर्टात गेले असता, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, “ईव्हीएमवर विश्वास नाही, भारत सोडून जगात कुठेही त्याचा वापर होत नाही. यावर अविश्वासाचा प्रश्न आहे आणि जगाने ते नाकारले आहे, मग आपण ते का नाकारू शकत नाही? ही मागणी घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात जात आहोत आणि सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा नक्कीच विचार करेल, असा आम्ही विश्वास बाळगतो.

काँग्रेसचे अध्यक्ष नानापटोले यांनी देखील ईव्हीएम वर अविश्वास व्यक्त केला आहे. लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोग त्यात काही हस्तक्षेप करत नसून आम्ही आमचा आवाज सर्वोच्च न्यायालयात पोहोचवणार आहोत. 

या प्रकरणी शिवसेना युबीटीच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल चिंतेचा पुनरुच्चार केले आहे. त्यांनी अशा चिंतांचे निराकरण करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) जबाबदारीकडे लक्ष वेधले. "भारतीय निवडणूक आयोगाची देखील काही जबाबदारी आहे, विशेषत: जेव्हा भारताच्या माजी निवडणूक आयोगाने असेही म्हटले आहे की मतदारांची संख्या वाढते आणि संख्येत अनियमितता दिसून येते, तेव्हा याची चौकशी केली पाहिजे," असे त्या म्हणाल्या 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Parbhani Violence :परभणीत अचानक हिंसाचार उसळला, महाराष्ट्रात हिंसाचार का झाला