Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nashik : पिठाच्या गिरणीत पडून 3 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

baby
, शनिवार, 27 मे 2023 (18:55 IST)
नाशिक : इंद्रकुंड भागात घरगुती पीठ गिरणीच्या बेल्ट मध्ये अडकल्याने 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रिहान उमेश शर्मा (रा. हिमालय हाऊस, इंद्रकुंड, पंचवटी) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा कुटुंबियांनी गुरूवारी दळण दळण्यासाठी घरगुती आटा चक्की मशिन सुरू केले होते. दळण टाकून श्रीमती शर्मा नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त असतांना ही घटना घडली.
रिहान आपल्या घरात खेळत असतांना गिरणीजवळ गेला. खेळता खेळता तो मोटारीच्या बेल्टमध्ये अडकला अचानक आवाज झाल्याने शर्मा यांनी धाव घेतली असता हा प्रकार समोर आला.

या घटनेत रिहानचे शरीर बेल्ट मध्ये अडकल्याने कोवळया हाडांचा चेंदामेंदा झाला. कुटुंबियांनी त्यास तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले. त्याची अनेक हाडे फॅक्चर असल्याचे समोर आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू असतांना रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. धवल यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.

Edited By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर जुन्या संसदेचं काय होणार? जाणून घ्या