Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nashik : सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार

Saptashrungi
, रविवार, 28 मे 2023 (17:13 IST)
Saptashrungi Temple Dress Code : नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर आता नवीन नियम लागू होणार आहे. आता सप्तशृंगी देवीच्या मंदिरात ड्रेसकोड लागू होणार आहे. मंदिराच्या व्यवस्थापन ,ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता पूर्ण पेहरावातच देवीचं दर्शन करता येणार आहे. 

भाविक जीन्स किंवा इतर पेहरावा करून देवीच्या दर्शनाला येतात त्यात वाईन पर्यटन साठी  देखील  पर्यटक येतात. त्यावर यावर घालण्यासाठी आता मंदिराच्या व्यवस्थापन, ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता ड्रेसकोडची सक्ती करण्यात येणार आहे. 
 
नाशिकच्या वणीची देवी सप्तशृंगी हे साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर दूरवरून भाविक येतात.आता भाविकांसाठी ड्रेस कोड करण्याचा निर्णय घेतलेला असून पुरुषांना सोवळे आणि महिलांना साडी नेसूनच आरतीनंतर देवीचं दर्शन घेता येणार आहे. देवीच्या गाभाऱ्यात जाताना पुरुष आणि महिलांना विशिष्ट पेहराव करणे बंधनकारक असणार. नोंदणी केलेल्या भाविकांनाच गाभाऱ्यात प्रवेश करता येणार आहे. आता पूर्ण पेहरावा करून आल्यावरच देवी सप्तशृंगीचे दर्शन भाविकांना करता येणार आहे.    




Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1 जूनपासून होणार हे तीन मोठे बदल, या गोष्टी महागणार