नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिर खणताना स्फोटकांचा स्फोट झाल्यामुळे तीन मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना हिरडी गावात रात्री साडे नऊ वाजता घडली आहे.विहिरीत काम करताना बार लावण्यात आला होता. या विहिरीत काही कामगार काम करत असताना अचानक बाजारातून स्फोट झाला आणि त्यात तिघांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.जखमीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाचा तपास करत आहे.