Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक :कुस्तीचा सराव सुरु असताना जवानास वीरमरण

death
, शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (21:26 IST)
नाशिक : जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील जवानास वीरमरण आले आहे. चांदवड तालुक्यातील हरनूल येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीनगरला कार्यरत असताना कुस्तीचा सराव सुरु असताना दुर्दैवी निधन झाले आहे. विक्की अरूण चव्हाण (२५) असे मृत जवानाचे नाव आहे.  जवान विक्की अरूण चव्हाण श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. ते स्वतः कुस्तीपटू असल्याने अनेक स्पर्धांच्या निमित्ताने सराव करत असायचे. सायंकाळी कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. 
 
विक्की चव्हाण  बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात दाखल व्हायचंय, असा चंग बांधून ते भारतीय सैन्यात दाखल झाले. गेल्या साडे चार वर्षांपासून ते भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. पहिल्यापासून कुस्तीची आवड असल्याने ते भारतीय सैन्य दलाकडून देखील कुस्ती खेळत असत. चव्हाण यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत  निवड झाली होती. त्यामुळे ते रोजच कुस्तीचा सराव करत असत. पुढील महिनाभरात ही स्पर्धा होणार होती. त्यामुळे चव्हाण यांची जोरदार तयारी सुरु होती. नेहमीप्रमाणे कुस्तीचा सराव सुरु असताना अपघात झाला यात चव्हाण यांना वीरगती प्राप्त झाली. 
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

G-20 मध्ये आफ्रिकन युनियन सहभागी; पण श्रेय कुणाचं, भारताचं की चीनचं?