Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात महत्वाचे बदल!

narendra modi
, शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (09:22 IST)
नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (ता.१२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांशी मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
 
तर, सभास्थळी येणार्याठिकाणी ठिकठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे, काही मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून, त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविल्यासंदर्भातील अधिसूचना शहर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग:
संतोष टी पॉईंट ते स्वामी नारायण चौकीकडे जाणारा मार्ग, तपोवन चौफुली ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग, स्वामी नारायण चौक ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग, काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉईंटकडे जाणारा मार्ग, अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग, जनार्दन स्वामी मठ टी पॉईंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर ते तपोवनकडे जाणारा मार्ग, निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग, बिडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग, नांदूरनाका ते तपोवनकडे जाणारा मार्ग, रासबिहारी ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग, तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग, दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग, टाकळी गाव, काठे चौकाकडून सिदधीविनायक चौक, अमृतधामकडे जाणारा मार्ग, सितागुंफा मंदिर ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग, काळाराम मंदिर ते नाग चौक, काट्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग, सरदार चौक ते काळाराम मंदिरकडे जाणारा-येणारा मार्ग, मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड, गाडगे महाराज पुलापर्यंत जाणारा-येणारा मार्ग.
 
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:
द्वारका उड्डाणपुलावरून जा-ये करता येणार
अमृतधाम, रासबिहारी मार्गे जा-ये
नांदूरनाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक बिटको, नाशिकरोड, जेलरोड, जत्रा चौफुलीमार्गे
नाशिकरोडकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने फेम सिग्नल, डीजीपीनगर, वडाळागाव, कलानगर, पाथर्डी फाट्यावरून मुंबईकडे दिंडोरी, पेठरोडकडून येणरी वाहने पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, रामवाडी पुलमार्गे इतरत्र

वाहन पार्किंग व्यवस्था:
वणी, दिंडोरी, पेठरोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी दत्ताजी मोगरे मैदान, पंचवटी
मुंबई, इगतपुरी, घोटी, वाडिवर्हे, त्र्यंबक, जव्हार, अंबड, सिडको, भद्रकालीकडून सभेसाठी येणारी वाहने मुंबई आग्रा रोडने जुना मुंबई नाका, द्वारका सर्कल, ट्रॅक्टर हाऊसकडून घंडागाडी डेपोजवळ पार्किंग

पुणे महामार्गाने येणारी वाहने नाशिकरोड रेल्वेपुलावरून खाली उतरून बिटको सिग्नलवरून जेलरोडकडे वळतील. औरंगाबाद रोडवरील रुद्रा फार्म मैदान, गीताई लॉन्स, शहाणे फार्म याठिकाणी वाहन पार्किंग

औरंगाबाद रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी लक्ष्मीविजय लॉन्स, रामसिता लॉन्स, यशवंत लॉन्स याठिकाणी पार्किंग
मालेगाव, धुळ्याकडून येणारी वाहने डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय चौफुली मैदानावर वाहन पार्किंग
मुंबईकडून धुळे व धुळ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहने उड्डाणपुलावरून मार्गस्थ होतील

मुंबईकडून औरंगाबादकडे जाणारी वाहने पाथर्डी फाटा, पाथर्डी गाव, वडाळागाव, डीजीपीनगर, फेम सिग्नल, पुणे महामार्गाने बिटको सिग्नलवरून जेलरोडमार्गे मार्गस्थ

रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, दिंडोरी रोड, पेठरोड, रामवाडी पुल, चोपडा लॉन्समार्गे येणारी वाहने तपोवन रोडच्या उजव्या बाजुने बुटूक हनुमान येथील मोकळ्या मैदानात वाहन पार्किंग
 खासदार, आमदार, शासकीय, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तपोवन सिटीलिंक बसस्टॅण्ड येथे वाहन पार्किंग

Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वामी विवेकानंद जयंती 2024 : स्वामी विवेकानंद महान व्यक्तिमत्त्व बायोग्राफी मराठी