Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक : पुलावरून कार कोसळून भीषण अपघात, 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू

नाशिक : पुलावरून कार कोसळून भीषण अपघात, 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू
, मंगळवार, 30 मे 2023 (20:41 IST)
नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला.
 
नांदगावच्या नाग्या-साक्या पुलावरून कार नदीपात्रात कोसळली. जालना जिल्ह्यात लग्न सोहळा आटोपून हे 10 जण परतत होते. तेव्हा मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला. जखमींवर मालेगावमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. याकुब रमजान मन्सूरी (वय 50), अफरोज अब्दुल लतिफ मन्सूरी (वय 35) व शिफा वसिम मन्सूरी (वय 4) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
 
जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील नाग्या-साक्या धरणासमोरील कठडा  नसलेल्या पुलावरून इको कार (एम.एच. 41 बि.ई. 1022) खाली नदीत कोसळली आणि अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
 
रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यानं प्रथमोपचार करत रुग्णांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Katraj : 3 महिन्याच्या बाळाने अंगठी गिळली