Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रीय कृषि परिषद की डान्सबार...? भाजपा आमदार अनिल बोंडे यांचा प्रताप

राष्ट्रीय कृषि परिषद की डान्सबार...? भाजपा आमदार अनिल बोंडे यांचा प्रताप
महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मदतीसाठी अपेक्षेने बघतो ते सरकारकडे... राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने मात्र शेतकऱ्याला मदतीच्या नावाखाली भरवलेल्या कृषि विकास परिषदेत चक्क नाच-गाण्यांचा कार्यक्रम घेतला. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे हा प्रकार घडला. कृषी विकास परिषदेच्या नावाखाली भाजपाने अश्लील नाचांचाच कार्यक्रम केला जणू... भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेतील मंचावर अर्धे-मुर्धेच कपडे परिधान करून आलेली एक तरुणी आणि तिच्यासोबत नाचणारा एक माणूस असा व्हीडियो व्हायरल झालाय. नाचणारा हा माणूस म्हणजे चक्क वरुडचे माजी नायब तहसीलदार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना दुष्काळासबंधी मार्गदर्शन राहिलं बाजूला, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्याचं मार्गदर्शनही राहिलं बाजूला... शेरो-शायरी आणि अश्लील नाचामुळेच ही परिषद गाजली...
 
एकीकडे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असतानाच भाजपाचे नेते मात्र असे नाच-गाण्याचे कार्यक्रम भरवून शेतकऱ्यांना कशी मदत करतायत, हे कोडंच आहे...भाजपाच्या आमदाराने शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली भरवलेल्या कृषिविकास परिषदेत चक्क नाच-गाण्यांचा कार्यक्रम घेतला. अमरावतीतील वरूड येथे हा प्रकार घडला. कृषी परिषदेच्या नावाखाली भाजपाने अश्लील नाचांचा कार्यक्रमच केला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री शिवसेनेचा युतीची बोलणी यावर थांबली