राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मुंबईत सभा झाली. त्या सभेवरून अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि त्याची समस्यां, लोड शेडींग आणि वाढत्या बेरोजगारीवर काही ही बोलले नाही त्यांनी ती सभा फक्त इतर पक्षांवर टीका करण्यासाठी घेतली होती. लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा असं म्हणत नवनीत राणांनी उद्धव ठाकरे यांचा वर घणाघाती टीका केली आहे. त्या रविवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
या परिषदेत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री गेले अडीच वर्ष कार्यालयात गेलेच नाही. तरीही मुख्यमंत्र्यानी राज्याचा दौरा केला. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कुठल्या भागाचा दौरा केला आणि शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवले. हे सांगावे. ठाकरे यांच्या काळात बेरोजगारी तिप्पटीने वाढली आहे. त्यांनी कित्येकांना रोजगार मिळवून दिले हे सांगावे. औरंगाबाद चे नाव बदल करण्याच्या मुद्द्यावर राणा म्हणाल्या की , औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर करण्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण आता तेच म्हणतात की औरंगाबादचे नाव बदल करण्याची काय गरज आहे. कारण नाव बदलले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली साथ सोडण्याची भीती त्यांना वाटत आहे. आणि सत्ता देखील जाऊ शकते. पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मधील कलम 370 रद्द करून दाखवले पण राज्याचे मुख्यमंत्री साधं एका शहराचं नाव बदलू शकत नाही. अशी घणाघात टीका राणा यांनी केली. महाराष्ट्रात सध्या अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगवासात आहे. या असे महराष्ट्रात या पूर्वी कधीही घडले नव्हते. आता नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहावे लागणार.