Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा,अजामीनपात्र वॉरंट फेटाळले

nawab malik
, मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (22:24 IST)
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खरे तर, मंगळवारी शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट फेटाळले. हे अजामीनपात्र वॉरंट महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीच्या प्रकरणात जारी करण्यात आले आहे. जो भाजप कार्यकर्ता मोहित कंबोज भारतीय यांनी 2021 मध्ये नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केला होता. या अजामीन पत्रावर दिलासा मिळण्यासाठी मालिकांनी शिवडी कोर्टात अर्ज सादर केले होते. या प्रकरणी त्यांना दिलासा मिळाला आहे. 2 लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नवाब मलिक यांना हा जामीन मंजूर करण्यात आला
 
नवाब मलिक यांच्याविरोधात हे अजामीनपात्र वॉरंट गेल्या आठवड्यात जारी करण्यात आले होते. खरेतर, नवाब मलिक गेल्या महिन्यात मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले नाहीत, ज्यावरून न्यायालयाने राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आता मंगळवारी नवाब मलिक न्यायालयात हजर झाले असता, त्यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट फेटाळण्यात आले आहे
 
ऑक्टोबर 2021 मध्ये मोहित भारतीय यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की क्रूझ ड्रग्ज जप्ती प्रकरणात नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर खोटे आरोप केले आहेत. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज जप्ती प्रकरणात अटक करण्यात आली होती.
 
मोहित भारतीय यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात भादंवि कलम 499 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. फरारी गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणात त्यांना  ईडीने फेब्रुवारी 2022मध्ये अटक केली होती. मलिक सध्या वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर बाहेर आहे. 
 





Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शी जिनपिंग G-20 मध्ये उपस्थित नसल्यामुळे भारताने चीनला दणका दिला