Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
आगामी विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. खासदार शरद पवार यांनी या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यभरातील मतदारसंघांचा आढावा घेतला.
 
यावेळी खासदार शरद पवार यांनी आलेल्या उमेदवारी अर्जांवर देखील चर्चा केली. मित्र पक्षांच्या अपेक्षा आणि मागण्यांबाबतही पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. येत्या काळात मित्रपक्षांशी चर्चा करून लवकरात लवकर जागावाटपाबाबतही तोडगा काढला जाईल, असा निर्णय बैठकीत झाला. विधानसभा निवडणुकीत कडवा लढा देऊन विजय संपादित करायचा सूर बैठकीत उमटला.
 
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील, छगन भुजबळ , खा. सुनील तटकरे , माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे , ज्येष्ठ नेते गणेश नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'संघ समजून घ्यायला आलो'; जर्मनीच्या राजदूतांची नागपूर भेट