राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांना बारा किलो लाडू भेट

शनिवार, 25 मे 2019 (09:59 IST)
बारामतीमध्ये भाजपला विजयी करून आणण्याची जबाबदारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पराभव व्हावा यासाठी चंद्रकांत पाटील बारामतीत तळ ठोकून होते. या मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ राहून कार्यकर्त्यांचे नियोजन करण्याचं काम चंद्रकांतदादा करत होते. 
 
दरम्यान निकाल लागल्यानंतर बारामतीत पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंना विजय प्राप्त झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांना बारा किलो लाडू भेट म्हणून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रविण शिंदे, यशवंत ठोकळ, विशाल जाधव यांनी कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जात ही भेट दिली. यावेळी चंद्रकांतदादांनीही त्यांचे स्वागत करत मला शुगर असल्याने गोड खात नाही असं म्हटलं. त्यावर कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर एक लाडू खाल्ला. तसेच सुप्रिया सुळे यांच्याशी चांगले संबंध आहेत. बारामतीत पुन्हा आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन भेट देऊ असंही चंद्रकांतदादांनी सांगितले.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी